【”माझा अनुभव”】
【”शब्द हाच भगवान-शब्द हाच शैतान, म्हणुनी नेहमी ठेवावे बोलतांना भान”】
माझे नाव सौ. मंजुषा जीवनजी पाटील आहे. आज मी “माझा अनुभव” या अनुभव मालिकेत मला आलेला ‘प्रथम दैवी शक्तीचा अनुभव’ सादर करीत आहे.
अनुभव मालिका सुरू केली, खुप छान वाटले व यात माझा पण अनुभव सर्वांपुढे सांगवा असे वाटले म्हणून आज मी माझा अनुभव सर्वांना सांगते आहे.
परमेश्वर, पति-पत्नीचे जे ऋणानुबंध असते, ते आधीच जोडून देतो अस म्हणतात. मला खुप स्वाभिमान आहे, की आज मी मार्गातील सेवकाची पत्नी आहे. मला भगवंताच्या कृपेने खुप छान परिवार मिळाला आहे. लग्न झाले त्या दिवसा पासून मला एका भगवंताची पूजा करायला सांगितले आणि ते मी मनापासून केली आहे व जीवनाच्या शेवटपर्यंत करत राहणार.
वैवाहिक जीवनाची सुरूवात झाली. आम्हाला आनंदाचा क्षण कळले की, घरात पाळणा हलणार आहे. आम्हाला हा योग आपल्या मार्गातील दैवी शक्ती मुळेच लाभला व बाळाची रक्षा करणे देखील याच परमेश्वराची जबाबदारी आहे असे जाणवले. बाळाच्या जन्मच्या एक महिन्या आधी पासूनच मला डॉक्टरांनी सांगितले की, बाळाला ऑक्सीजन व्यवस्थित मिळत नाही आहे व माझ्या शरीरात रक्ताचे प्रमाण खूप कमी झाले आहे. बाळाचे वजन पण खूप कमी होते. तर आम्ही डॉक्टरी इलाज सोबत भगवंतापुढे शब्द ठेवला की, सर्व व्यवस्थित होवु द्या! आपल्या मार्गात “शब्द हाच भगवान आहे” हे सर्व सेवकांना माहिती आहे.
नंतर आम्ही आमच्या मार्गदर्शकांना आपली समस्या कळविली, त्यांनी त्यावेळी धैर्य देत सुंदर प्रोत्साहन प्रति मार्गदर्शन केले. अचानक बाळाची हलचल कमी झाली म्हणून डॉक्टरकडे गेलो, तर ते म्हणाले की, डिलेवरी करावी लागणार. त्यानंतर ऍडमिट करून घेतले व ८ नोहेंबर २०१४ ला आमच्या घरी पुत्र प्राप्ती झाली. भगवंतापुढे ठेवलेला शब्द पूर्ण झाला व सर्व काही व्यवस्थित झाले. मला व बाळाला काहीही झाले नाही. बाळ पण छान जन्माला आले. सर्व काही खुप छान राहीले, बाळाला कुठल्याही प्रकारची औषध देण्याची गरज भासलिच नाही. आश्चर्य तर तेव्हा झाले की, अनेक बाळ हॉस्पिटलमध्ये जन्माला आले व त्यांना ऑक्सिजनची कमी जाणवू लागली, तर इतर आजार दिसू लागतात; परंतु आमच्या बाळाची जणू स्वतः भगवंत काळजी घेत होते. बाळाला कोणत्याही उपचार करण्याची गरज भासली नाही.
बाळाच्या जन्मानंतर ज्या क्रिया व्हाव्यात, त्या बाळ पूर्णतः होत होत्या आणि हेच आम्हाला डोळ्यासमोर दिसलेले भगवंत गुण आहे. काही दिवसांपूर्वी डॉक्टर म्हणायचे की, बाळाला ऑक्सिजन मिळत नाही, हलचल नाही, वजन कमी आहे..! असे बरेच काही बोलायचे; परंतु जेव्हा बाळाचा जन्म झाला व त्यांना कळले की, हे बाळ इतर जन्मास आलेल्या बाळांपैकी सुदृढ आहे, त्यांना हे ऐकून आनंद झाला, त्यांनी आपल्या बाबांच्या कृपेला धन्यवाद दिले. कारण त्यांना आपल्या मार्गाबाबत बरीच माहिती आहे व ते आपल्या “परमात्मा एक” मार्गाचा आदर करतात.
बाळ आज सुद्धा भगवंताच्या कृपेने ठीक आहे. आज माझ्या बाळाला ३ वर्षे, ८ महिने झाले व तो आज LKG मध्ये Army School ला शिक्षण घेत आहे. त्याच्या वर्ग शिक्षिका नेहमी त्याचे कौतुक करीत असतात की, मौलिक इतर विद्यार्थ्यांपेक्षा खूप वेगळा आहे, आपल्या मौज मस्तीत गुंग राहून आपले शालेय वर्क छान करतो व नेहमी इतर ऍक्टिव्हिटी मध्ये उत्साहीत राहतो. कारण, या बाळाची एनर्जी खूप जास्त आहे.
असे बरेच अनुभव आम्हाला या मार्गातील दैवी शक्तीने दिले आहे, जे माझ्या बाळाशी संबंधित आहे. बाळाला हळुहळु मार्गाच्या रुपरेषेचे वळण लागत आहे, त्याला मार्गाच्या शक्तीची जाणीव व्हायला लागली आहे, कधी काही लागलं किंवा काही झालं की प्रथम “बाबा हनुमानजी, म्हणून रक्षा लावून फुक मारावी लागतं हे त्याला कळते. घरात व इतरांना नमस्कार करावा हे त्याला कळते, स्वाहा कळते अर्थात हवन कार्य! आपल्या बोबड्या शब्दांत विनंती-प्रार्थना आमच्या मागोमाग म्हणत असतो. स्वतः आपल्या करिता योग मागतो, त्याला कळते की, बाबाला आपली इच्छा/ योग सांगितले की, ते सर्व ठीक करतात. असे त्याचे ध्येय निर्माण झालेलं आहे व मजबूत होत आहे.
आमच्या घरात घडलेल्या अनेक सुंदर घडामोडी व झालेला बदल यातून आम्हाला नेहमी प्रेरणा मिळत असते, ज्या प्रकारे पावलोपावली दैवीशक्तीने आम्हाला साथ दिला व जे अनुभव घडले, ते साधारण नाही. कारण, दैवीशक्ती खूप महान आहे. दैवी शक्तीचे अनुभव जर डोळ्यांनी बघायचे असेल तर गृहस्थी जीवनात नक्की कळते. म्हणून आपल्या मार्गाला कौटुंबिक मार्ग म्हटलं आहे, जो एकट्याला न मिळता पूर्ण कुटुंबाला मिळतो.
वरील घडलेल्या अनुभवावरून कळते की, जर आपण आपल्या कुटुंबात भगवंताला समोर ठेऊन ध्येय मजबूत ठेवले व सर्व अधिकार भगवंताला दिले तर ते स्वतः ही बाजू निभावून घेतात. भगवंत आपल्या सोबत हवा असेल तर आपल्याला आयुष्यभर तत्व, शब्द, नियमाचे पालन करणे खूप आवश्यक आहे. तेव्हाच आपण भगवंत गुण बघू शकतो. आता आमच्या कुटुंबात छान भरभराट आहे, सर्व काही आनंदी आनंद आहे.
लिहिण्यात काही चुक-भुल झाली असेल तर “भगवान बाबा हनुमानजी” व “महानत्यागी बाबा जुमदेवजी” यांना क्षमा मागते.
नमस्कार..!
सौजन्य:-
“सर्व सेवक -सेविका”
मानवधर्म सेवक परिवार