बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की,त्यांनी आपल्या कुठुंबात मर्यादा पाळली पाहीजे. स्त्रीयांनी पतीसी नेहमी मर्यादेनेच बोलले पाहीजे. प्रत्येक मानवाने मर्यादाशिल असने आवश्यक आहे. लहानांनी मोठ्यांशी वागतांना किव्हां मोठ्यांनी लहानांशी वागतांना एकमेकां विषयी मर्यादा ठेवली पाहिजे. सेवकांनी सेवकासी वागतांना मर्यादेने वागावे.ईथे मर्यादा म्हणजे सुशिक्षित -अशिक्षित किव्हा गरिब- श्रीमंत हि मर्यादा नव्हे.तो भेदभाव आहे.सर्व सेवक परमेश्वराला सारखे आहे.बाबांनी सर्व पुजा बंद केली आहे.आणि एकाच परमेश्वरा बद्दल सांगितले आहे.हि खरी मर्यादा आहे ती पाळली पाहिजे. मर्यादा पाळल्या मुळे घरात,आप आपसात प्रेम निर्माण होते. त्यामुळे सर्वांना आयुष्यात सुख ,समाधान मिळते. ऐकमेकां विषयी प्रेमाची भावना निर्माण होते.त्यामुळे सत्ये व्यवहार होतात.
।।मर्यादा पाळणे।।