Featured

।।वाईट व्यसन बंद करण्याची कल्पना।।(कोजागिरी)

या मार्गाची सुरुवात झाली तेव्हा बाबा जुमदेवजी यांनी भगवंताची प्राप्ती करुन आपल्या परीवाराचे दुःख दुर केले.त्या वेळेस सामाजिक कार्य सुद्धा सुरू केले.”एक व्येक्ती आपल्या विचाराने संपुर्ण देशाला बदलू सकतो”ही म्हन बाबांना तंतोतंत लागु होतो. धार्मिक, सामाजीक कार्य करित असतांना बाबांनी सेवकांना जवळुन पाहीले. ओळख या मार्गाची परंपरा आहे.

दरवरशी जी कोजागिरी पोर्णिमा येते.ती दुध पिवुन साजरी केली जाते.आपल्या मार्गात या परंपरेची सुरुवात शांतीनगर मधून झाली. ज्या सेवकांनी ही सुरुवात केली.त्या मागे त्यांचा स्वार्थ होता.त्याचा अनुभव असा की,तो सेवक बाजारातून दुध न देणारी गाय,म्हैस खरेदी करीत होता. ती गाय,म्हैस खुप असक्त असायची.त्या सेवकाला जानिव होती ,की बाबा आपल्या घरी आले आणि ह्या गाय,म्हैसी च्या पाठि वरुन जरी हात फिरवले .तरी सुद्धा तीचे संपूर्ण दुःख दुर होत असायचे.

काही वर्षानंतर लालगंज पेवढा, येथील एका सेवकाने म्हटले कि,बाबा माझ्या घराच्या गच्चीवर पुष्कळ जागा आहे.या वर्षी कोजागिरी आपन माझ्या घरी साजरी करावी. याला बाबांनी होकार दिला.या कोजागिरीत पुष्कळ सेवक हजर होते.तो सेवक खुप हुशार होता.त्या सेवकानि बाबाला म्हटले कि, दरवर्षी आम्ही कोजागिरीत दुधच पितो.आज आपन दुधामध्ये थंडाई(भांग) टाकुन पाजायचे. बाबांनी या गोष्टीला होकार दिला. कारण बाबा सेवकांच्या ईच्छेला टाळत न्हवते. कारण बाबाला जे निराकार शब्द मिळाले .त्या “ ईच्छा नुसार भोजन “या शब्दाचा समावेश होता. परंतु ह्या शब्दांचा सुद्धा दुर उपयोग सेवक करीत आहेत.कोजागिरी झाल्या नंतर एक-एक कप दुध सेवकांनी प्राशन करुन काही सेवक घरी गेले. बाबा सुद्धा गेले. परंतू काही सेवक उरलेले दुध पुन्हा पिवु लागले.त्यानी दुध भरपूर प्रमाणात प्राशन केले.ईतके दुध प्यायले कि त्यांना घरी जाण्याचा सुद्धा होश राहीला नाही.कोणी सेवक गच्चीवर ,पायरीवर, नालीत सुद्धा पडुन होते.आणि ही घटना बाबांसमोर आली .तेव्हा बाबांना सेवकांचे वाईट व्येसन बंद करण्याबाबत विचार करावा लागला.

।।धन्यवाद।।

।। मानवधर्म सेवक परिवार।।

तिन शब्द ।।प्रेमाने वागणे।।

।।प्रेमाने वागणे।।

सेवकांनी आपल्या कुठुंबात सर्वांबरोबर प्रेमाने वागले पाहीजे. कोणावरही रागावू नये.कोणी चुकेल तर त्याला समजावून सांगावे.लहान मुलांना प्रेमाने सांगितले तर त्यांना लवकर कळते. पण रागावले तर त्यांचे आत्मबळ कमी होते. जेनेकरुन ते घाबरतात, आणि त्यामुळे मर्यादा भंग होते.प्रेम हा भगवंताला आवडणारा प्रथम गुण आहे.प्रत्येक मानवाच्या मनात प्रत्येका विषयी प्रेम असावयास पाहिजे. म्हणून म्हटले आहे.’ढाई अक्षर प्रेम का पढे सो पंडीत होय।’

तिन शब्द।। मर्यादा पाळणे।।

बाबा सेवकांना नेहमी मार्गदर्शन करतात की,त्यांनी आपल्या कुठुंबात मर्यादा पाळली पाहीजे. स्त्रीयांनी पतीसी नेहमी मर्यादेनेच बोलले पाहीजे. प्रत्येक मानवाने मर्यादाशिल असने आवश्यक आहे. लहानांनी मोठ्यांशी वागतांना किव्हां मोठ्यांनी लहानांशी वागतांना एकमेकां विषयी मर्यादा ठेवली पाहिजे. सेवकांनी सेवकासी वागतांना मर्यादेने वागावे.ईथे मर्यादा म्हणजे सुशिक्षित -अशिक्षित किव्हा गरिब- श्रीमंत हि मर्यादा नव्हे.तो भेदभाव आहे.सर्व सेवक परमेश्वराला सारखे आहे.बाबांनी सर्व पुजा बंद केली आहे.आणि एकाच परमेश्वरा बद्दल सांगितले आहे.हि खरी मर्यादा आहे ती पाळली पाहिजे. मर्यादा पाळल्या मुळे घरात,आप आपसात प्रेम निर्माण होते. त्यामुळे सर्वांना आयुष्यात सुख ,समाधान मिळते. ऐकमेकां विषयी प्रेमाची भावना निर्माण होते.त्यामुळे सत्ये व्यवहार होतात.

।।मर्यादा पाळणे।।

तिन शब्द।। सत्ये बोलणे।।

।।सत्ये बोलणे।।

सत्ये म्हणजे आत्म्यातून निर्भिडपणे निघालेले शब्द समोरच्या व्यक्ती च्या मनावर कोनताही परिणाम होवो .याची तमा नबाळगता निघनारे शब्द.नाहीतर पुढच्या व्येक्तिवर आपल्या शब्दाचा वाईट परिणाम न होता त्याला समाधान देणारे शब्द बोलने. जे वारंवार बोलल्या जातात ते सत्ये शब्द नव्हेत.हे सर्रास खोटे बोलणे आहे.अशा सब्दा मुळे मानवाची फसवनुक होते.मानवाच्या मानेवर जर सुरी चालवली तरी सत्ये बोलले पाहीजे. सत्ये कठु असते.पण ते परमेश्वराला प्रिय असते.”भगवान के घर देर है अंधेर नही” या म्हणी प्रमाणे सत्यसुद्धा फार उशिरा कळते.या मार्गाची जाग्रुत क्रुपा आहे.या मार्गातखोटे बोलणे वर्जे आहे.व्यावहारिक नियम काहिहि असेल तरी सत्यानेच व्यवहार केले पाहीजे. सत्ये कार्याची भितीश मनात ठेवु नये. कारण त्याच्या करिता भगवत क्रुपा नेहमी जवळ असते.”सत्ये परमेश्वर आहे .आणि परमेश्वर सत्ये आहे”सत्ये बोलल्या मुळे कुठुंबातील लोकांमध्ये मर्यादा असते.आणि सर्व व्यवहार प्रेमाने चालतात.

Design a site like this with WordPress.com
Get started